तपशील
ऐका
कृषी
कीटक
कृषी ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
26 Nov
Follow

पिकांवरील वाळवीची लक्षणे व व्यवस्थापन (Symptoms and management of Termite on crops)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारत हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो. भारतात विविध शेतात विविध पिके घेतली जातात आणि याचं पिकांना विविध रोग व कीटक हानी पोहचवत असतात. भारतात जवळपास 45% शेतीला वाळवीचा फटका बसतो. म्हणूनच आजच्या या लेखात आपण पिकांवरील वाळवीची लक्षणे व व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

वाळवी किडीबद्दल (About Termite):

  • वाळवीचे विविध प्रकार असतात.
  • आपल्या देशात वेगवेगळ्या प्रांतनुसार वेगवेगळ्या वाळवी आपणांस पाहायला मिळतात.
  • ही कीड प्रौढ अवस्थेत मोठी, कडक, राखाडी-तपकिरी आणि सुमारे एक मिलीमीटर लांबीची होते.
  • वाळवी मातीच्या दरीमध्ये किंवा पडलेल्या पानांच्या खाली लपते.
  • रात्रीच्या वेळी झाडांची पाने किंवा मऊ देठ खाते आणि पिकाचे नुकसान करते.
  • वाळवी एक पॉलीफॅगस कीड असून, सर्व पिके नष्ट करू शकते.
  • बटाटे, टोमॅटो, मिरची, वांगी, फुलकोबी, कोबी, मोहरी, राई, मुळा, ऊस गहू इत्यादी पिकांचे वाळवी जास्त नुकसान करते.

वाळवी काय काय खाते?

  • वाळवीचा मुख्य आहार लाकूड आहे.
  • त्यांचे जबडे लाकूड कापण्यास सक्षम असते.
  • मानवांसाठी आवश्यक असणारे लाकूड आणि चामड्याच्या वस्तूंची वाळवी सर्वात मोठी शत्रू आहे.

वाळवी किडीची लक्षणे (Symptoms of Termite):

  • वाळवी साधारणतः पिकांचे मूळ नष्ट करते किंवा जमिनीखाली येणारे पिक नष्ट करते.
  • वाळवी ही कीड जमिनीत बोगदे बनवते आणि वनस्पतींची मुळे खाते.
  • जेव्हा उद्रेक जास्त असतो तेव्हा वाळवी स्टेम/खोड देखील खाते.
  • मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव जास्त असतो.
  • नवीन उगवलेल्या रोपांचे हा कीटक नुकसान करतो.
  • कीडग्रस्त झाडे सुकतात, कोरडी पडतात.
  • मोठी झाडे सावकाश कोरडी पडून मरतात.

वाळवी नियंत्रणपद्धती(Management of Termite):

  • कीड नियंत्रणासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून शेतकरी अधिक प्रभावीपणे कीड नियंत्रण करू शकतात.
  • वाळवीला रोखण्यासाठी कच्चे शेण कधीही शेतात टाकू नये.
  • कच्चे शेण हे वाळवीचे आवडते अन्न आहे.
  • या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपाइरीफॉस 20% ईसी (टाटा-तफाबान)10 मिलीने प्रति क्विंटल बियाण्यावर प्रक्रिया करावी.
  • क्लोरोपाइरीफॉस 20% ईसी (टाटा-तफाबान) 1 लिटर/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 0.3% जीआर (देहात-स्लेमाईट) 8 किलो प्रति एकरचा बेसल डोस द्यावा किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डबल्युजी (देहात-Demfip) 100 ग्रॅमने प्रति एकरी ड्रेंचिंग करावे.

तुम्ही तुमच्या पिकामधील वाळवी किडीचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. वाळवी कीड कशी ओळखायची?

वाळवी ही कीड प्रौढ अवस्थेत मोठी, कडक, राखाडी-तपकिरी आणि सुमारे एक मिलीमीटर लांबीची होते.

2. वाळवी कीड कुठे लपते?

वाळवी मातीच्या दरीमध्ये किंवा पडलेल्या पानांच्या खाली लपते.

3. वाळवीचा प्रादुर्भाव जास्त कोणत्या जमिनीत होतो?

मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव जास्त होतो.

36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor