ऊस पिकामध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय (Symptoms and Remedies of Nutrient Deficiency in Sugarcane Crop)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांपैकी एक आहे तसेच ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक पीक आहे. ऊस हे उष्णकटिबंधीय व बहूवर्षीय पीक आहे. महाराष्ट्रात ऊस लागवडीचे अडसाली, पूर्व-हंगाम, सुरु आणि खोडवा हे चार प्रमुख हंगाम आहेत. अडसाली ऊसाची लागवड जून/जुलै महिन्यात केली जाते. हे पीक 15 ते 18 महिने शेतात राहते. पूर्व-हंगामी ऊसाची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, सुरु ऊसाची लागवड जानेवारीमध्ये तर खोडवा पिकाची लागवड डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते. ऊसाची लागवड चार हंगामात केल्याने साखर कारखान्यांना सतत ऊस पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत होते. अडसाली हंगामात पुणे, अहमदनगर, माळशिरस, फलटण या भागात ऊस लागवड केली जाते. पूर्व हंगामी हंगामात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लागवड केली जाते तर मराठवाडा, विदर्भ, धुळे, नंदुरबार व जळगाव येथे सुरु हंगामात लागवड केली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी खोडवा पीक घेतले जाते. ऊसाला इतर बारमाही पिकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते. आजच्या या भागात आपण ऊस पिकामधील पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय याविषयी जाणून घेणार आहोत.
बहुतेक वेळा वेगवेगळ्या पिकामधील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे वेगळी असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया ऊस पिकातील पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे व उपयांविषयी (Symptoms and Remedies of Nutrient Deficiency in Sugarcane Crop):
नायट्रोजनची कमतरता (Nitrogen Deficiency):
- ऊसाची सर्व पाने पिवळ्या रंगाची होतात आणि वाढ थांबते.
- ऊसाच्या दांड्याचा व्यास कमी होतो आणि जुनी पाने पक्व होण्याच्या अगोदर वाळून जातात.
- ऊसाच्या मुळांची लांबी वाढते परंतु व्यास लहान राहतो.
उपायः
- 40% Nitrogen (इफको-युरीया) 100 ग्रॅम किंवा
- 19:19:19 (देहात न्यूट्री - NPK) 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
फॉस्फरसची कमतरता (Phosphorus Deficiency):
- ऊसाच्या दांडाची लांबी कमी होते.
- पानांचा रंग हिरवा, निळा, होतो आणि पानांची वाढ थांबून पाने अखूड (अरुंद) राहतात.
- फुटवा कमी होतो, प्रतिबंधित मूळ विकासासह खोडं / मुळं (गुणोत्तर) घटते.
उपाय:
- 18:46:0 (ईफको-डी.ए.पी.) 100 ग्रॅम किंवा
- 12:61:00 (देहात न्यूट्री - MAP) 75 ग्रॅम किंवा
- 00:52:34 (देहात न्यूट्री - MKP) 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
पोटॅशिअम कमतरता (Potassium Deficiency):
- वाढ चांगली होत नाही.
- जुनी पाने पिवळी पडुन किनाऱ्यावर कोरडी पडतात आणि नारंगी, पिवळा रंग जुन्या पानांमध्ये दिसु लागतो ज्यात अनेक क्लोरोटिक स्पॉट विकसित होतात जे नंतर मृत, तपकिरी होतात.
- पानाच्या पात्याच्या व मध्य शिरेच्या बह्याकेंद्री पेशी लालसर दिसु लागतात. नवीन पाने एकाच केंद्रबिंदू पासून बाहेर पडल्यासारखी दिसतात. त्याचबरोबर खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
उपायः
- 13:00:45 (देहात न्यूट्री - पोटॅशिअम नायट्रेट) - 75 ग्रॅम किंवा
- 00:00:50 (देहात न्यूट्री - पोटॅशिअम सल्फेट) - 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- पीक लहान असल्यास 00:00:50 वापरू नये.
झिंक कमतरता (Zinc Deficiency):
- जस्ताच्या कमतरतेमुळे पानामध्ये रंगद्रव्यांचा विकास न करण्याची प्रवृत्ती दिसून येते.
- मुख्य शिरांबरोबर हरीतद्रव्याचे नुकसान झाल्यामुळे सफेद पट्टे पडल्यासारखे दिसतात.
- जास्त प्रमाणामध्ये जस्ताची कामतरता असल्यास पेशीसमूहाचा काही भाग मृत होतो आणि पेशींची वाढ थांबते.
उपाय:
- शेणखतासोबत झिंक सल्फेट मोनोहायड्रेट (देहात न्यूट्री - ZnSO4) 5 ते 7 किलो प्रति एकरी द्यावे.
- Zn12%-EDTA (देहात न्यूट्री - Zn12%) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे.
लोह कमतरता (Iron Deficiency):
- लोह कमतरतेची लक्षणे साधारणपणे नवीन पानावरती दिसून येतात.
- हरीतद्रव्यांचे प्रमाण कमी होते व फिक्कट पट्टे समांतर ओळींमधून दिसतात.
- जास्त प्रमाणामध्ये कमतरता असल्यास नवी पाने शिरांसह पूर्णपणे पांढरी पडतात व मुळांची वाढ देखील खुंटते.
उपायः
- शेणखतासोबत फेरस सल्फेट (देहात न्यूट्री - FeSo4) 5 किलो प्रति एकरी द्यावे.
- Zn12%-EDTA (देहात न्यूट्री - Zn12%) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे.
बोरॉनची कमतरता (Boron Deficiency):
- वाढ खुंटते, विकृत आणि हरितरोगग्रस्त पाने तयार होतात.
- पानावरती व देठावर जखम झाल्यासारखे वृण दिसतात.
उपाय:
- बेसल डोस देताना चेलट्स बोरॉन 20% (देहात न्यूट्री - बोरॉन 20%) 2 किलो प्रति एकरी द्यावे.
- चेलट्स बोरॉन 20% (देहात न्यूट्री - बोरॉन 20%) हे 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा 500 ग्रॅम प्रति एकरी ड्रीप मधून 7 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा सोडावे.
तुमच्या ऊस पिकामध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेची कोणती लक्षणे दिसून आली व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात ऊस पिकाची लागवड कुठे होते?
ऊसाचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे येथे घेतले जाते.
2. ऊस पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
ऊस पिकावर प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ पोखरणारी अळी, खवले कीड तसेच पोक्का बोईंग, लालकूज, तांबेरा, ऊसाची चाबूक काणी आणि मर रोग यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.
3. अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास काय करावे?
शक्य तितक्या लवकर कमतरता असलेले अन्नद्रव्य घटक असलेल्या खताची फवारणी करावी किंवा जमिनीतुन द्यावे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor