तंत्रज्ञानामुळे तांत्रिक माहिती थेट मोबाईलवर

पशुपालनामध्ये सर्वसाधारपणे नोंदी नियमित न ठेवल्या जाणे, आरोग्य तपासणीमध्ये माहितीचा अभाव, चारा तसेच पशुखाद्याची पुरेशी माहिती नसणे, कुशल कामगारांचा अभाव, वातावरणातील होणारे विविध बदल याची तांत्रिक माहिती नसल्याने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. यावर मात करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे काळानुरूप महत्वाचे आहे. त्यामुळे पशुपालकास लाभ होऊन त्यांचे उत्पन्न वाढेल.
यासाठी काही उपयुक्त ॲप: लाइव्हस्टॉक फार्म मॅनेजमेंट ॲप, दामिनी ॲप, कृषी मंडी ॲप, ई-पशू चिकित्सा, इफ्को किसान ॲप, पशू आधार, सरकारी ॲप,
टीप कोणतेही डिजिटल साधन वापरण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता, वापरकर्ता पुनरवलोकन आणि तुमच्या विशिष्ट पशुधन शेतीच्या गरजांशी सुसंगतता पडताळण्याची खात्री करावी.
पशुसंवर्धन विभागासाठी शासनाचे संकेतस्थळ:
https://ahd.maharashtra.gov.in
तुम्ही पशुपालनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता का? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. याशिवाय, तुम्ही येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून, टाइम स्लॉट निवडून व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकांचा मोफत सल्ला देखील मिळवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
