टोमॅटो मधील उशिरा येणारा करपा रोग व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी बंधू/भगिनींनो,
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. महाराष्ट्रात टोमॅटो लागवडीखाली अंदाजे 29190 हेक्टर क्षेत्र आहे. टोमॅटो पिकाची लागवड महाराष्ट्रात सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये होते परंतु सर्वात जास्त लागवड नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा जिल्ह्यामध्ये होते. वातावरणातील सततच्या बदलांमुळे टोमॅटो पिकामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. आज आपण त्यातीलच एका म्हणजेच टोमॅटो पिकामधील उशिरा येणाऱ्या करपा रोग व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
करपा रोगाबद्दल थोडक्यात:
- करपा हा एक बुरशीजन्य रोग असून याची लक्षणे ही रोपाच्या पानांवरती सहजपणे दिसून येतात.
- करपा रोग बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतात. तसेच झाडाचे रोगग्रस्त अवशेष, हवा, पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो.
आता जाणून घेऊया उशिरा येणारा करपा रोगा विषयीची माहिती,
लक्षणे:
- पाने, खोड, फांद्या आणि हिरव्या, लाल फळांवर आढळून येतो.
- सुरवातीला पानावर काळपट ते फिक्कट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात.
- ढगाळ हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड, पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात.
- अती आर्द्र हवामानात पानाच्या पृष्ठभागावर आणि ठिपक्याच्या कडेवर पांढऱ्या बुरशीची वाढ होते.
नियंत्रणासाठी उपाय:
- पिकाची फेरपालट करावी.
- लागवडीपूर्वी रोपांवर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
- झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावित अथवा जाळून नष्ट करावीत.
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 25 ग्रॅम प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- रोगाची लक्षणे दिसताच अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात अझिटॉप) 300 मिली प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- अझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात सिमपेक्ट) 1 मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा
- क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यूपी (कोरोमंडल-जटायू) 2.5 ग्रॅम प्रति लीटर पाणी फवारणी करावी किंवा
- फ्लुओपिकोलाइड 62.5 + प्रोपामोकार्ब हाइड्रोक्लोराइड 625 एससी (बायर-इन्फिनिटो) 400-450 मिली प्रति एकर फवारणी करावी किंवा
- एमेटोक्ट्रैडिन 27% + डिमेथोमोर्फ 20.27% एससी (बीएएसएफ-झम्प्रो) 320 से 400 मिली प्रति एकर फवारणी करावी.
फवारणी करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी:
- फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी.
- फवारणी करताना सिलिकॉनयुक्त स्टिकरचा 5 मिली प्रति पंपनुसार वापर करावा.
- 2 औषधे मिसळताना औषधे फुटल्यास त्वरित आमच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून मार्गदर्शन घ्या.
तुमच्या टोमॅटोच्या पिकात उशिरा येणाऱ्या करपा रोगाची कोणती लक्षणे दिसून येतात? तुम्ही तुमचे पीक वाचविण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor