ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
तुरीचे दर बाजारात हमीभावापेक्षाही कमी; शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

खरिपातील नगदी पीक अशी ओळख असलेल्या तुरीचे दर कमालीचे घटले आहेत. खुल्या बाजारात हमीदराच्या तुलनेत पाचशे रुपये कमी दराने तूर विकल्या जाऊ लागली आहे. सोयाबीन व कापसाचे भाव पडले असताना आता तुरीचेही दर पडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशातच केंद्राने तूर आयातीला एक वर्ष मुदतवाढ दिल्याने भविष्यात आणखी दर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
46 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
