तपशील
ऐका
वांगी
कीटक
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
20 Dec
Follow

वांगी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर खरीप, रब्‍बी आणि उन्हाळी हंगामात केली जाते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. वांग्यामध्ये सर्वात जास्त नुकसानकारक फळ पोखरणारी अळी आढळून येते. जी वांगी पिकाचे 40 टक्क्यांपर्यंत नुकसान करते. वेळीच उपाययोजना न केल्यास हे नुकसान 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. वांग्यावरील फळे पोखरणारी अळी ही कीड अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थांमधून आपले जीवन पूर्ण करते. त्यापैकी अळी अवस्था आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते. म्हणूनच आजच्या या लेखात आपण किडीच्या नियंत्रणासाठी काय त्वरित उपाययोजना कराव्यात याविषयी जाणून घेणार आहोत.

लक्षणे:

  • ही अळी शेंड्या व कोवळी पाने पोखरत असल्यामुळे पाने व फुले गळतात.
  • एक अळी 4 ते 6 फळे नष्ट करू शकते.
  • पोखरलेल्या वांग्याच्या फळाबाहेर अळीची विष्ठा राहत असल्यामुळे हे वांगे खाण्याकरिता किंवा बाजारपेठेसाठी योग्य राहत नाही.

एकात्मिक कीड व्यवस्थापन:

  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी, त्यामुळे किडींच्या विविध अवस्था नष्ट होतात.
  • एकाच शेतामध्ये वर्षानुवर्षे वांग्याचे पीक घेऊ नये. जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पीक घेणे टाळावे.
  • पिकांची योग्य प्रकारे फेरपालट करावी.
  • मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
  • लागवडीसाठी वांग्याच्या सुधारित व शिफारशीत वाणांचा वापर करावा. या पिकाला गरजेनुसार खतमात्रा द्यावी. आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • प्रादुर्भावग्रस्त झाडाचे शेंडे व फळे तोडून अळ्यांसहीत त्यांचा नायनाट करावा.
  • वाणांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
  • प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत.
  • वांगी पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. यामुळे फळे पोखरणाऱ्या अळीच्या तीव्रतेची कल्पना येईल.
  • पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा (अँझाडिरेक्टीन 10 हजार पीपीएम ) 2.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • प्राथमिक अवस्थेत जैविक कीटकनाशकचा वापर करावा.
  • गोमूत्र @20%, निमार्क, सीताफळाच्या पानांचा अर्क, घाणेरीच्या पानांचा अर्क @10% याची फवारणी घ्यावी.
  • वरील उपाययोजना केल्यावरही शेंडा व फळे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा अधिक आढळल्यास, रासायनिक नियंत्रणाचा विचार करावा.

रासायनिक नियंत्रण:

  • क्लोरअँट्रानिलीप्रोल 18.5% एस सी (धानुका-कव्हर) @0.4 मिली/लीटर पाणी किंवा
  • थियाक्लोप्रिड 21.7% एस सी डब्ल्यू/डब्ल्यू (बायर-अलांटो) @2 मिली/लीटर किंवा
  • इमामॅकटीन बेझोईट 5% एसजी – (देहात-इल्लिगो) @ 0.5 ग्रॅम किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) @1 मिली/लीटर पानी किंवा
  • सायपरमेथ्रीन 3% + क्विनोलफॉस 20% इसी (युपीएल-विराट) @0.8 मिली किंवा
  • पायरिप्रोक्सिफेन 5% ईसी + फेनप्रोपॅथ्रिन 15% ईसी (सुमेप्रेप्ट-सुमिटोमो) @1.5-2 मिली प्रति ली पानी प्रमाणात फवारणी करावी.
  • प्रत्येक फवारणीच्या वेळी कीटकनाशक बदलावे.

तुमच्या वांग्याच्या पिकात फळे पोखरणाऱ्या अळीची कोणती लक्षणे दिसत आहेत का? तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. आणि हो, वांगी उत्पादन तंत्राविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/3U502Dv6CFb हे वाचा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


39 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor