विदर्भ- मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांसाठी १४९ कोटींच्या निधीला मान्यता
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासह पशुपालन व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी दूग्ध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. याआधी विदर्भ आणि मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यात काम सुरू केलं गेलं असून आता उर्वरीत ८ जिल्ह्यात देखील दूग्ध विकास प्रकल्पांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील दुसऱ्या टप्यातील प्रकल्पांच्या कामासाठी १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने केले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भातील दूग्ध विकास प्रकल्पांबाबत मंगळवारी (ता. १३) राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानंतर विखे यांनी याची माहिती एक्सवर द्विट करत दिली आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor