तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 July
Follow

विदर्भातील बाजारांत तुरीच्या दरात सुधारणा

कळमना बाजार समितीत तुरीची नियमित आवक होत आहे. मात्र गेल्या पंधरवाड्यापासून तुरीचे दर दबावात असताना आता त्यात काहीशी सुधारणा अनुभवली जात आहे. १०,००० ते १०,८०० रुपयांनी तुरीचे व्यवहार होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी तुरीने १२ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर तुरीच्या दरात प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांची घट नोंदविण्यात आली. सध्या तुरीची आवक १९१ क्विंटल असून तुरीला १०,००० ते १०,८०० रुपयांचा दर मिळत आहे. अवघ्या एक दिवस आधी १०,५०० ते ११,००० रुपयांनी तुरीचे व्यवहार होत होते.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor