वर्षातील शेवटचा साखरेचा विक्री कोटा फायद्याचा की तोट्याचा, प्रतिक्विंटल साखरेच्या दरात वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबरचा साखर विक्रीचा घटवलेला कोटा, रेल्वेने दरात दिलेली सूट आणि सणांमुळे साखरेची मागणी व दरातही वाढ झाली आहे. यामुळे साखरेच्या दरात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांसह कारखानदारांच्या पत्त्यावर पडणार आहे. मागच्या ४ दिवसांपूर्वी सप्टेंबरचा विक्री कोटा २३ लाख ५० केला. गेल्यावर्षी तो २५ लाख टन होता. यावेळी तो दिड लाख टनांनी घटवला आहे. साखरेचा कोटा घटवल्यानंतर २४ तासांतच साखरेच्या दरात प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, यावर्षीचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या सप्टेंबरचा जाहीर झालेला कोटा हा हंगामातील शेवटचा कोटा असले. १ ऑक्टोबरपासून नवा कोटा केंद्र सरकारकडून जाहीर होणार आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor