तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
10 Aug
Follow

गाव तेथे गोदाम योजना 2024 (Warehouse Scheme)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन घेतात. मात्र शेतकऱ्यांकडे उत्पादित मालाची साठवणूक करण्यासाठी सुविधा नसते. त्यामुळे त्यांना कवडीमोल भावात बाजारपेठेत जाऊन आपला माल विकावा लागतो. साठवणूक करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते ही शेतकऱ्याची अडचण लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना गाव तिथे गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी गोदाम योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात 100 नवीन गोदाम बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच उपलब्ध असलेल्या गोदामाच्या दुरुस्तीसाठी देखील सरकारने पुढाकार घेतला आहे. आज आपण या योजनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

गाव तिथे गोदाम योजनेचे उद्देश (Warehouse scheme Purpose):

  • शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक व्हावी.
  • शेतमालाचे नुकसान नासाडी टळावी.
  • शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात विकावा लागू नये म्हणून सुरक्षित गोदाम उपलब्ध करून देणे.
  • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.

गाव तिथे गोदाम योजनेची वैशिष्ट्ये (Warehouse scheme Features):

  • राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी.
  • शेती प्रक्रिया आणि कृषी अवजारे साठवण्यासाठी गोदाम उपलब्ध.
  • महाराष्ट्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन.
  • नॅशनल बॅंक फॉर ॲग्रीकल्चर ॲण्ड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) च्या सहकार्याने योजना राबवली जाईल.

गाव तिथे गोदाम योजनेचा लाभ (Warehouse scheme Benefits):

  • शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी गोदामांची सुविधा.
  • शेतमालाचे नुकसान टाळणे आणि गुणवत्ता राखणे.
  • शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये यासाठी मदत.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी योजना.

गाव तिथे गोदाम योजनेची पात्रता (Warehouse scheme Eligibility):

  • राज्यातील सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी (लहान, मध्यम आणि मोठे शेतकरी)
  • ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः.

गाव तेथे गोदाम योजनेची अर्ज प्रक्रिया (Warehouse scheme Online Application steps):

  • गाव तेथे गोदाम योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • योजनेचा अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
  • या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज अपलोड करावा.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सरकारच्या पोर्टलला भेट द्यावी.

संपर्क:

योजनेसाठी अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कृपया महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटला भेट द्या.

योजना GR पहा – GR PDF

तुम्ही गाव तेथे गोदाम योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. गाव तेथे गोदाम योजनेचे उद्देश काय?

शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात विकावा लागू नये म्हणून सुरक्षित गोदाम उपलब्ध करून देणे हे गाव तेथे गोदाम योजनेचे उद्देश आहे.

2. गाव तिथे गोदाम योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत?

राज्यातील सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी (लहान, मध्यम आणि मोठे शेतकरी) व ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः.ही योजना आहे.

3. गाव तिथे गोदाम योजनेसाठी अधिकृत वेबसाईट कोणती?

गाव तिथे गोदाम योजनेसाठी महाराष्ट्र शासनाची सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाची वेबसाइट अधिकृत आहे.

27 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor