तपशील
ऐका
तण
कृषी
कृषी ज्ञान
काजू
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
20 Oct
Follow

काजू पिकातील तण व्यवस्थापन (Weed management in cashew crop)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

फळझाडांमध्ये हापूस आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते. त्याचप्रमाणे काजूला 'फळांची राणी' म्हटले जाते. भारतात काजूची ओळख पोर्तुगीज लोकांनी अंदाजे ४०० वर्षांपूर्वी करून दिली. काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. काजू पिकातील तण हे अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी पिकाशी स्पर्धा करतात यामुळे काजू पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. आजच्या या लेखात आपण काजू पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

काजू पिकासारख्या फळबागेतील झाडांना देण्यात येणाऱ्या खते, पाणी व सेंद्रिय खते यामुळे पिकात गवतवर्गीय तसेच द्विदल वर्गीय तणांचा प्रादुर्भाव आढळतो. ही तणे विशेषतः झाडाच्या भोवताली मोठ्या प्रमाणावर आढळतात.

आता जाणून घेऊया तण काढताना काय काळजी घ्यावी याविषयी:

  • झाडे लावल्यानंतर 15-20 दिवसांनी निंदणी करावी.
  • काजूच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात म्हणुन खोल आंतरमशागत कधीही करू नये.
  • आंतरमशागत हलकी व वारंवार करावी.
  • वर्षातून दोन वेळा उभी-आडवी हलकी नांगरणी व वखरणी करावी.
  • जमीन भुसभुशीत ठेवल्याने फळांची प्रत व उत्पादन सुधारते.
  • आळ्यातील गवत खुरप्याने निंदून घ्यावे.
  • पावसाळ्यात हिरवळीचे खत पीक पेरणे व तागाची पेरणी करुन फुलावर येण्याअगोदर जमिनीत गाडून टाकणे चांगले.
  • ठिबक सिंचन वापरल्यास तण वाढीचे प्रमाण कमी असते.

प्रतिबंधात्मक उपाय:

  • बहुवार्षिक तणे पाऊस सुरू होण्यापूर्वी मुळासकट काढून टाकावीत.
  • बहुवार्षिक तणांकरिता फळझाडांच्या दोन ओळीतील जागेत खोल नांगरट करावी अथवा मधल्या जागेत कडधान्य हिरवळीची पिके घ्यावीत किंवा अच्छादन टाकून तणांचा बंदोबस्त करावा.
  • पेरणी करता तणविरहित बियाणे वापरावे.
  • पूर्ण कुजलेली सेंद्रीय खते वापरावीत.
  • मशागतीची अवजारे स्वच्छ करूनच वापरावीत.
  • तणयुक्त जागेतील मातीचा वापर टाळावा.
  • रोप पुनर्लागवडीच्या वेळी त्यासोबत तणांचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पाण्याच्या पाटाजवळील किंवा कुंपणालगतची तणे काढून टाकावीत.

निवारणात्मक उपाय

  • तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांचा नायनाट करण्यासाठी वापरायच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात.
  • यांत्रिक पद्धत : हाताने तण उपटणे, खुरपणी, हात खांदनी, मशागत, कापणी, छाटणी, तण क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे, अच्छादन करणे इत्यादी.
  • स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतींचा अवलंब करणे, वेळेवर पेरणी, एकरी रोपांची संख्या योग्य ठेवणे, योग्य पीक फेरपालट, आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करणे तथापि फळबागेत फुलोऱ्यात व फळधारणेच्या वेळी कोणतेही आंतरपीक घेणे योग्य नाही कारण फुलोऱ्यात व फळधारणेच्या अवस्थेत फळझाडास ओलावा व अन्नद्रव्यांची अधिक गरज असते.
  • जिवाणूंचा वापर करणे जैविक तणनाशकांचा वापर करणे.
  • रासायनिक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे.

काजू बागेत ग्रास कटरचा फायदा:

  • वेळ व पैसा वाचतो.
  • कापलेले तण मल्चिंग स्वरूपात वापरता येतात. यामुळे येणाऱ्या तणांची संख्या देखील कमी होते.

कोणते तणनाशक वापरावे?

रासायनिक नियंत्रण:

  • अधिक विस्तार असलेल्या झाडांमधील तण नियंत्रण करण्यासाठी ग्लायफोसेट 41% एसएल (देहात-MAC7) किंवा ग्लायफोसेट 71% एसजी (सुमितोमो-एक्सेल मेरा 71) 800 ते 1200 मिलीची एकरी फवारणी पिकाशी संपर्क न येता करावी
  • लहान विस्तार असलेल्या झाडांमधील तण नियंत्रण हे हाताने खुरपाच्या साहाय्याने करावे.

तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी (Precautions to be taken while spraying herbicides) :

  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

तुम्ही काजू पिकाचे तणांपासून कसे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. काजू पिकासाठी अनुकूल हवामान कोणते?

काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल असते.

2. काजू पिकासाठी योग्य जमीन कोणती?

समुद्रकाठची जांभ्या दगडापासून तायर झालेली उत्तम निच-याची जमीन, आम्लधर्मीय जमीन काजू पिकासाठी योग्य आहे.

3. काजू पिकाच्या छाटणीसाठी योग्य वेळ कोणती?

काजू पिकासाठी मे महिन्यात झाडांची छाटणी फायदेशीर ठरते.

43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor