तपशील
ऐका
तण
कृषी
कृषी ज्ञान
सेंद्रिय शेती
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
27 Oct
Follow

सेंद्रिय शेतीतील तण व्यवस्थापन (Weed Management in Organic Farming)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. तसेच उपलब्ध आकडेवारीनुसार एक तृतीयांशपेक्षा जास्त उत्पादनातील घट ही केवळ तणांमुळे येते तसेच तणांमुळे केवळ पीक उत्पादनच घटत नाही तर तणांच्या प्रादुर्भावामुळे कृषि उत्पादनाची गुणवत्ता, जैव विविधता, मनुष्याचे व जनावरांचे आरोग्य या गोष्टींवरही विपरीत परिणाम होतो. तणांचा प्रादुर्भाव आढळल्यास आपण तणे उपटून किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून तणांचा बंदोबस्त करत असतो. मात्र सेंद्रिय शेती ही रसायनविरहित केली जात असल्याने त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे रसायन वापरता येत नाही. म्हणजेच तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जैविक पद्धतीचा अवलंब किंवा सेंद्रिय शेतीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तणांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे लागते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण सेंद्रिय शेतीतील तण व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

तण म्हणजे काय?

शेतात नको असलेली नको त्या ठिकाणी येणारी किंवा पिकांना नुकसानकारक व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करणारी अशी कोणतीही वनस्पती म्हणजे तण होय.

तणांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत ते म्हणजे:

1) एकदलवर्गीय – शिप्पी, लोना, मरड, घोडकात्रा, पंदाड, हराळी, कुंदा, लव्हाळा, विंचू चिमणचारा.

2) द्विदलवर्गीय – दीपमाळ, दुधी, नाठ, कुंजरू, काठेमाठ, माका, हजारदाणी, तांदुळजा, पेटारी, रानताग, उंदीर काणी, शेवरा, चिमटा, रानएरंडी, गाजर गवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथर, चांदवेल, चंदनबटवा इ.

तणांचा शेतीसाठी व सेंद्रिय खत म्हणून वापर आणि त्याचे फायदे:

  • तणनाशकाने तणांचे नियंत्रण करण्याऐवजी गरजेप्रमाणे ब्रश कटरने तण कापून तेथेच कुजविले तर या पद्धतीने आपण तणांकडून सेंद्रिय खत मिळवू शकतो.
  • फळबागेत अगर लांब अंतरावरील पिकात मिश्र पिकाऐवजी तण व्यवस्थापन केले तर, ज्या पिकात तणे वाढविण्यास वाव नाही तेथे पिकाच्या काही ओळींनंतर तणाचे पट्टे ठेवल्यास सेंद्रिय रित्या तणांना जोपासता येऊ शकते.
  • मुख्य पीक आणि मिश्रपिक म्हणजे तणे, जमिनीची अशी वाटणी केल्यास तणांपासून जमिनीला पुरेसे सेंद्रिय खत मिळेल.

सेंद्रिय पद्धतीने पिकांमध्ये तणांचे व्यवस्थापन:

  • तणांचे निर्मूलन, नियंत्रण, समूळ उच्चाटन नष्ट करू नका. त्या ऐवजी त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. तण उपटून न टाकता ती कापून आच्छादन म्हणून वापरा.
  • तणांचे जमिनीवरील व जमिनीखालील सर्व अवशेष जमिनीत विलीन करणे शक्य आहे.
  • तणांचे बी विकत आणावे लागत नाही. पेरणीसह कोणतीही निगा राखण्याचे काम अजिबात न करताही तणांची भरमसाठ वाढ होते.
  • अशा अल्प खर्चाच्या शेतीच्या सर्व नियमांचे पालन करणारी तणाशिवाय अन्य कोणतीच वस्तू शेतीत सापडणार नाही.
  • तण हे दुधारी अस्त्र आहे. दुर्लक्ष केले तर तुमचे पीक खाऊन टाकेल. उपयोग करून घेता आला तर फायदाच फायदा होईल.
  • तणे रानात आली पाहिजेत. ती मुख्य पिकाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने वाढविली पाहिजेत.
  • मोठे तण, जून केले पाहिजेत.
  • तणांच्या मुळाचे, खोड, पानांचे खत करता येईल, त्यामुळे ती जितकी मोठी होतील तितके जास्त खत मिळणार आहे.
  • उत्तम दर्जाचे खत मिळवण्यासाठी तण जूने करणे भाग आहे. त्यासाठी तणांच्या वाढीसाठी रानात पिकाबरोबर योग्य जागा उपलब्ध करून द्यावी.
  • मल्चिंग पद्धतीने देखील तणांचे नियंत्रण करता येते.
  • जैविक मल्चिंग : सेंद्रिय (Organic Farming) मल्चिंगमध्ये पेंढा, पाने इत्यादींचा वापर केला जातो. त्याला नैसर्गिक मल्चिंग असेही म्हणतात. ते खूप स्वस्त आहे. झिरो बजेट शेतीमध्येही (Farming) याचा वापर केला जातो. शेतकरी बांधवांनो, यासाठी पिकांचे अवशेष जाळू नका तर आच्छादनासाठी वापरा. मल्चिंगचा वापर केल्याने पिकांच्या अवशेषपासून सुटका होईल आणि उत्पादनही जास्त मिळेल.
  • प्लास्टिक मल्चिंग : प्लॅस्टिक मल्चिंग बाजारात उपलब्ध आहे. हे सेंद्रिय मल्चिंगपेक्षा महाग आहे. पण ते झाडांना पूर्ण संरक्षण देते.
  • सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तणांचा वापर करता येऊ शकतो.
  • तसेच नंतर या तणांचा वापर जनावरांसाठी वैरण म्हणून देखील करता येईल.
  • तण हे शेतीतील सर्वात महत्त्वाचे संसाधन आहे. याचे कारण त्यापासून सेंद्रिय खत मिळते इतकेच नाही. तणांचे शेतीत अगणित उपयोग आहेत.

सेंद्रिय पद्धतीने तण नियंत्रणाचे फायदे:

  • मुख्य पिकांना परिपोषक मूलद्रव्ये पुरवतात.
  • जमिनीवरील मातीचे सरंक्षण करतात.
  • जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
  • जमिनीत हवा खेळती ठेवण्यास मदत करतात.
  • काही तण त्रासदायक तणांसाठी वाढरोधक म्हणून काम करतात.
  • तण मेल्यानंतर मुंग्या, गांडुळे व जीवाणूंसाठी खाद्य म्हणून वापरले जाते.
  • तणांच्या मुळाकडून जमिनीची मशागत होते.
  • तणांच्या मुळांद्वारे पाण्याचे संवर्धन होते.
  • तणांमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन होते.
  • तणांमुळे जास्त पाऊस काळात जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकर होतो, तर कमी पाऊस, दुष्काळ अशावेळी जल संवर्धन होते. दोन्ही विपरित परिस्थितीत पिकाचे संरक्षण होते, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
  • पिकाला गरजेप्रमाणे अन्नपुरवठा करणारी जिवाणू सृष्टी हवेच्या सान्निध्यातच काम करते. तण व्यवस्थापनातूनच फक्त गरजेचा हवा पुरवठा होऊ शकतो.
  • अतिरिक्त अन्नपुरवठा तणांनी फस्त केल्यामुळे पिकाला संतुलित अन्नपुरवठा होतो. यामुळे पिकावर रोग किडी कमी येतात. फवारण्या कमी होतात.
  • जागेवरच कुजण्याच्या क्रियेतून निर्माण होणारी संजीवके पिकाच्या वाढीसाठी वृद्धिकारक म्हणनू काम करतात.
  • जागेवरच कुजण्याच्या क्रियेतून निर्माण होणारी सेंद्रिय आम्ले जमिनीचा सामू उदासीन करतात.
  • पिकाच्या उत्पादनाच्या दर्जात आमूलाग्र सुधारणा होण्यात मदत होते.
  • तणापासून तयार झालेले सेंद्रिय कर्ब अनेक वनस्पतींपासून तयार झालेला असतो. त्यामुळे या सेंद्रिय खताचा दर्जा सर्वोत्तम असतो.
  • नवीन संशोधनानुसार सेंद्रिय खतासाठी एकदल वनस्पती अधिक उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. रानातील तणांमध्ये कितीतरी एकदल वनस्पती व गवतवर्गीय वनस्पती आढळतात.
  • जमिनी सुपीक होत जातील, तसे तणांच्या जातीत आपोआप बदल होत जातो. जमिनीला व पिकाला काय पाहिजे ते आपल्यापेक्षा निसर्गाला जास्त चांगले कळते.
  • हे सर्व फायदे अगदी विनामूल्य पदरात पाडून घेता येतात.
  • हे सर्व सेंद्रिय पद्धतीने पिकांमध्ये तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्राथमिक आहे. जगातील कोणत्याही पिकासाठी, कोणत्याही भौगोलिक क्षेत्रासाठी तितकेच उपयोगी आहे.

तुम्हाला वरील माहिती आवडली का? तुम्ही देखील सेंद्रिय शेतीतील तण व्यवस्थापन करू इच्छिता का हे आम्हाला कंमेंट्समध्ये सांगा. तसेच याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. तण किती प्रकारचे असतात?

तणांचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात. प्रथम म्हणजे एकदलवर्गीय व दुसरं म्हणजे द्विदलवर्गीय.

2. सेंद्रिय पद्धतीने तणांना कशाप्रकारे जोपासता येऊ शकते?

फळबागेत अगर लांब अंतरावरील पिकात मिश्र पिकाऐवजी तण व्यवस्थापन केले तर, ज्या पिकात तणे वाढविण्यास वाव नाही तेथे पिकाच्या काही ओळींनंतर तणाचे पट्टे ठेवल्यास सेंद्रिय रित्या पिकाला जोपासता येऊ शकते.

3. तण व्यवस्थापनाचे काय फायदे आहेत?

  • तणांच्या मुळाकडून जमिनीची मशागत.
  • तणांच्या मुळांद्वारे पाण्याचे संवर्धन होते.
  • तणांमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन होते.
43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor