गहू पिकातील तण व्यवस्थापन! (Weed management in Wheat crop!)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारतातील गहू लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक असून, गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी सु. 30 टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. याच गव्हाच्या पिकात गहू पेरणीनंतर तणांची पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश आणि पुरेशी जागा यासाठी होणारी स्पर्धा टाळण्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण गहू पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
गहू पिकात प्रामुख्याने आढळणारे तण:
बथुआ, हिरणखुरी, मोथा गवत, वनबत्री, आक्री, जंगली ओट्स, कृष्णनिल इत्यादी गहू पिकामध्ये प्रामुख्याने आढळणारे तण आहेत. ते जास्त प्रमाणात झाल्यास गव्हाचे उत्पादन 35 ते 40 टक्के कमी होते. तणांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. चला आता पाहूया तण व्यवस्थापनाविषयी.
मोकळ्या शेतात लागवडी अगोदर वापरावयाचे तणनाशक:
- पैराक्वाट डाइक्लोराइड 24% एसएल (देहात-चॉपऑफ) - बिन-निवडक, गवत 6 इंच उंच होण्याच्या अगोदर 800-1000 मिली एकरी वापरावयाचे तणनाशक.
- ग्लायफोसेट (देहात-MAC7) - बिन-निवडक, गहु लागवडी पूर्वी 800-1000 मिली एकरी वापरावयाचे तणनाशक.
गहु लागवडीनंतर मात्र तण उगवणीपूर्वी वापरावयाची तणनाशके:
पेंडीमेथिलिन 30% ईसी (ईफको-जाकीयामा) - गहू पेरणीनंतर ताबडतोब दहा लिटर पाण्यामध्ये 40 ते 50 मि.लि. या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. उगवुन आलेले तण यामुळे नियंत्रणात येत नाही.
गहु लागवडीनंतर मात्र तण उगवणीनंतर वापरावयाची तणनाशके:
- मेटसल्फ्यूरोन मिथाईल 20% डब्ल्यूपी (ईफको-माकोतो) - गहू उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांत वापारवे. वापर केल्यानंतर गव्हाची पाने काही प्रमाणात पिवळी पडू शकतात, मात्र 2 आठवड्यात पुर्वव्रत होतात. वापर केल्यानंतर कडाक्याची थंडी पडल्यास मात्र गव्हांस जास्त ईजा पोहचते.
- मेटसल्फ्यूरोन मिथाईल 20% डब्ल्यूपी (ईफको-माकोतो) - लागवडीनंतर 25 ते 35 दिवसांत वापरावे. तणास 2 ते 4 पाने असावीत आणि जमिनीत ओल असावी. रेसिड्युअल इफेक्ट असल्यामुळे जास्त काळ नियंत्रण मिळते.
टीप -
तणनियंत्रणासाठी काही इतर पर्याय उपलब्ध नसल्यासचं तणनाशकांचा वापर करावा.
शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर केल्यावर सुद्धा पिकांची वाढ काही काळापुरती मंदावत असते.
शेजारील व आंतरपिकांचा विचार करून तण नाशकाची फवारणी करावी.
तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी (Precautions to be taken while spraying herbicides) :
- तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
- तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
- रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
- तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
- तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
- फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
- तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
- उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
- तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
- तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.
तुमच्या गव्हाच्या पिकात कोणत्याप्रकारचे तण आढळून आले? तुम्ही कशाप्रकारे नियंत्रण मिळविले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. गहू पिकासाठी अनुकूल हवामान कोणते?
गहू पिकाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशीत हवामान चांगले मानवते.
2. गहू पिकासाठी योग्य जमीन कोणती?
पाण्याचा चांगला निचरा होणारी माध्यम ते भारी जमीन गहू पिकासाठी योग्य आहे.
3. गहू पिकाच्या पेरणीसाठी योग्य वेळ कोणती?
जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तर बागायती पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor