पिकांमध्ये पांढऱ्या माशीचे एकात्मिक व्यवस्थापन (Whitefly management in crops)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय पिके तसेच केळी, पपई अशा विविध पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर उपाययोजना करणे अशक्य असल्याने पिकाचे संपूर्ण नुकसान होते. तसेच विषाणूजन्य रोगांचे वहन पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींमुळे होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकात रस शोषक किडींचे वेळीच नियंत्रण करणे महत्वाचे असते. पांढरी माशी (Whitefly) ही रसशोषक किड पिकांमधील पानाचा रस शोषून (sap sucking insects) पिकाला नुकसान पोहोचवते. म्हणूनच आपण आजच्या लेखात पांढरी माशी कीटक आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
पांढऱ्या माशीची ओळख (Identification of the Whitefly):
- पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
- रंग भुरकट पांढरा व डोळ्यांचा रंग लाल असतो.
- या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
- कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
- पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.
पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms of whitefly):
- पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
- या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
- झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
- या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
पंढरीमाशी कोणत्या पिकांमध्ये कोणत्या विषाणूजन्य रोगांचे वहन करते?
टोमॅटो: बोकड्या किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग (टीवायएलसीव्ही)
कारली, खरबूज, कलिंगड, भोपळा : यलोव्हेन मोझॅक
उपाय (Remedy):
- प्रति एकर शेतात 4 ते 6 पिवळे चिकट सापळे वापरा.
- कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
- याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्राम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा
- किंवा थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
- थायामेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-एन्टोकिल) 100 मिली प्रति 200 ली पाणी वापरावे किंवा
- बुप्रोफेझिन 15% + एसीफेट 35% डब्ल्यूपी (अदामा-टापझ) 400 ग्रॅम/एकर वापरावे किंवा
- इंडोक्साकार्ब 14.5% + एसीटामिप्रिड 7.7% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (घरडा-काईट) 160 ते 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
- डिनोटेफुरन 20% एसजी (पीआय इंडस्ट्रीज -ओशीन) 50 ग्रॅम ते 80 ग्रॅम एकरी 150 ते 200 लिटर पाण्यातून फवारावे.
सर्व रसशोषक किडींचे (Sucking Pest) सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिवळे चिकट सापळे - 10 नग प्रति एकरी लावावेत. पांढरी माशी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या पिकांमधील पांढरी माशी कीटकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. रसशोषक किडी पिकाचे काय नुकसान करतात?
रसशोषक किडी पिकांमधील पानाचा रस शोषून (sap sucking insects) घेऊन पिकाला नुकसान पोहचवतात.
2. पांढरी माशी कशी ओळखावी?
पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो तसेच रंग भुरकट पांढरा व डोळ्यांचा रंग लाल असतो, या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते त्यावरून हे कीटक ओळखता येऊ शकतात.
3. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव लक्षणांवरून कसा ओळखावा?
पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो यावरून पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ओळखता येऊ शकतो.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor