पेरणीपूर्वी बटाट्याची बीजप्रक्रिया करणे का आवश्यक आहे? (Why Potato seed treatment is necessary before sowing?)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
बटाटा हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून, या पिकाची लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. भारतात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड केलेली पाहायला मिळते. बटाटा पिकामध्ये आधुनिक लागवड पद्धती, बियाणे निवड प्रक्रिया या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास पिकापासून मिळणाऱ्या नफ्यात वाढ होऊ शकते तसेच पेरणीपूर्वी बटाट्याची बीजप्रक्रिया करणे देखील बटाटा पिकासाठी फायदेशीर ठरू शकते.
कोणतेही पीक लावताना आपण जसे जमिनीची पूर्व मशागत करतो तसेच पिकामध्ये येणाऱ्या कीडीचे व रोगाचे प्रतिबंधात्मक नियोजन करणे फायदेशीर ठरते. यासाठी बियाण्यांची बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पीक संरक्षणामध्ये जेवढे महत्व फवारणी मधून कीड रोग नियंत्रणासाठी दिले जाते तेवढे महत्व बीजप्रक्रीयेस दिले जात नाही. बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करीत नाहीत, बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात. आजच्या आपल्या या भागात आपण बटाटा पिकात बीजप्रक्रिया करणे का आवश्यक आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
बीजप्रक्रिया (seed treatment) म्हणजे काय ?
बियाणे जमिनीत पेरण्यापुर्वी जमिनीतुन किंवा बियाण्यातुन पसरणारे विविध रोग व किडी यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपांच्या जोमदार वाढीसाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रसायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. यालाच बीजप्रक्रिया असे म्हणतात.
बटाट्याची बीजप्रक्रिया (Seed treatment in Potato):
- बटाटा कंदाची साठवण कोल्ड स्टोरेजमध्ये केलेली असल्या कारणास्तव लागवड करण्यासाठी बटाटा कोल्ड स्टोरेज मधून कमीत कमी एक आठवडा बाहेर काढून ठेवावा.
- साधारणतः 25 ते 40 ग्रॅम वजनाचा बटाटा कंद लागवडीसाठी वापरणे हिताचे असते परंतु, 25 ते 40 ग्रॅम वजनाचा बटाटा कंद नसल्यास कंद आकाराने तसेच वजनाने मोठा असल्यास कंदाचे दोन अथवा चार आकारानुसार किंवा वजनानुसार समान भाग करावे.
- कापणी केल्यानंतर हवेतील रोगापासून संरक्षण करण्यासाठी लागवडीपूर्वी कंदाचे एक किलो मॅन्कोझेब 75% डबल्यु पी (देहात-DEM45) + 4 ते 5 टाल्कम पावडर याच्या मिश्रणाबरोबर सुकी प्रक्रिया करून घ्यावी.
- रासायनिक प्रक्रियेनंतर (आठ तासानंतर), नत्रयुक्त घटकांच्या पूर्तीसाठी कंद 2.5 किलो अझोटोबॅक्टर (ह्युमिक फॅक्टरी) आणि 500 मिली द्रव्यरूप अझोटोबॅक्टर (ईफको) प्रति 100 लिटर पाण्यामधून मिश्रण करून अर्ध्या तासासाठी बीज प्रक्रिया करावी.
बीज प्रक्रियेचे फायदे (Advantages of seed processing):
- जमिनीतुन व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
- बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
- रोपे सतेज होतात व जोमदार वाढतात.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
- कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करता येते.
बीज प्रक्रिया करताना घ्यायची काळजी (Precautions to be taken while processing seeds):
- बीज प्रक्रियेच्या वेळेस वापरण्यात येणारे भांडे इतर गोष्टींकरता वापरण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
- हातात बीज प्रक्रियेचा वेळेस हातमोजे घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- बीज प्रक्रिया केलेल्या बियांचा जनावर व माणसाच्या खाण्याकरीता वापर करू नये.
- बीज प्रक्रियेसाठी लागणारी औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावी. ती कमी पडल्यास रोगापासून हवे तेवढे संरक्षण मिळणार नाही.
- ज्या बियाण्यावर प्रक्रिया केली आहे अशे बियाणे थंड व कोरड्या जागेत ठेवावे.
- हे बियाणे हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिक पिशवीत ठेऊ नये.
- सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात औषधे लागतील याची, काळजी घ्यावी.
अशा प्रकारे योग्य रित्या, पेरणीपूर्वी बटाट्याची बीजप्रक्रिया केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या बटाटा पिकाच्या लागवडीआधी बीजप्रक्रिया कशाप्रकारे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. बटाटा पिकाची लागवड कधी करावी?
बटाटा पिकाची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करावी.
2. बटाट्याचे पीक किती दिवसात येते?
बटाट्याचे पीक 90 ते 100 दिवसांत कापणीसाठी तयार होते.
3. बटाटा पिकात आढळून येणारे मुख्य रोग कोणते?
करपा व खोक्या रोग हे बटाटा पिकात आढळून येणारे प्रमुख रोग आहेत.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor