तपशील
ऐका
कृषी
आंबा
फलोत्पादन
कृषी ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
11 Nov
Follow

आंबा पिकात नोव्हेंबर महिन्यात करावयाची कामे (Work to be done in November in Mango crop)


नमस्कार मंडळी,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

आंबा शेती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कृषी व्यवसाय आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे आंबा उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्रातील आंबा शेती मुख्यत्वे राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात केली जाते, जेथे हवामान आणि मातीची परिस्थिती आंब्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. तथापि, पीक यशस्वी होण्यासाठी आंबा शेतीसाठी योग्य जागा निवडणे आणि हवामानारूप योग्य ते व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण आंबा पिकामध्ये चांगल्या बहारासाठी जानेवारी महिन्यात करावयाच्या कामांविषयी जाणून घेणार आहोत.

ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात फुलकळी निघणे व त्यांची काडीवर अवस्था झाल्यावर, तुरकळ प्रमाणात मोहोर येण्यास सुरुवात होते ती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या अखेरपर्यंत. या कालावधीत झाडाच्या वयानुसार कोणत्या झाडाला किती पाणी द्यावे याविषयी जाणून घेऊया.

1ले वर्ष: 6.8 ते 1 लिटर पाणी.

2रे वर्ष: 2.8 ते 3.3 लिटर पाणी.

3रे वर्ष:  6.3 ते 7.5 लिटर पाणी.

4 वर्ष पुढे: 10 ते 13 लिटर पाणी.

टीप: मोहोर आल्यानंतर हळूहळू पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन:

आंबा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे अतिशय महत्वाचे आहे. अतिसघन आंबा बागेसाठी व मध्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्याचे घटक असलेल्या जमीनी मधील अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी खालील खतांच्या मात्रेची शिफारस केली आहे. माती परिक्षणा आधारित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनाची शाश्वती खुपच अचुक होते.

अतिसघन आंबा पिकासाठी सर्वसाधारण जमीनीसाठी खत व्यवस्थापन:

पहिल्यावर्षी : नत्र 35 ग्रॅम, स्फुरद 15 ग्रॅम, पोटॅश 25 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.

दुसऱ्यावर्षी : नत्र 45 ग्रॅम, स्फुरद 25 ग्रॅम, पोटॅश 50 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.

तिसऱ्यावर्षी : नत्र 75 ग्रॅम, स्फुरद 50 ग्रॅम, पोटॅश 75 ग्रॅम, शेणखत 10 किलो प्रति झाड द्यावे.

चार वर्षाच्या पुढील झाडास : नत्र 120 ग्रॅम, स्फुरद 75 ग्रॅम, पोटॅश 100 ग्रॅम, शेणखत 15 किलो प्रति झाड द्यावे.

अतिसघन लागवडीच्या आंबा बागेसाठी विद्राव्य खतांचे व्यवस्थापन:

मोहोर येण्यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात: नत्र 40%, स्फुरद 30%, पोटॅश 20%

मोहोर येणे व फळधारणा अवस्थेत: नत्र 20%, स्फुरद 20%, पोटॅश 25%

या अवस्थेंसाठी कमीत कमी 6 वेळा विद्राव्य खतांच्या मात्रा देणे आवश्यक आहे.

मोहोराच्या वेळी आंबा पिकावर मुख्यतः तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ढेकूण, करपा, भुरी रोग असे विविध प्रकारचे कीटक व रोग आढळून येतात. याचे वेळीच नियंत्रण केल्यास मोहोराला होणारे नुकसान टाळता येईल.

मोहोराच्या विविध अवस्था असतात त्या अवस्थांमध्ये पिकावर कोणत्या प्रकारच्या फवारण्या घ्याव्यात याविषयी जाणून घेऊया:

मोहोर येण्या आगोदर पोपटी रंगाच्या पालवीवर करावयाची फवारणी:

डेल्टाम्रेथीन 2.8% ईसी (बायर-डेसिस) 270 मिली प्रति 300 लिटर पाणी याची एकरी फवारणी मोहोरावर घ्यावी. या फवारणीमुळे तुडतुड्यांपासून मोहोराचे संरक्षण होईल.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच मोहोर दिसण्याच्या 15 दिवस आधी लॅम्बडा सहालोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) 15 मिलीची 15 लिटर पाण्यातून संपूर्ण झाडावर फवारणी घ्यावी.

पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसाने करावयाची दुसरी फवारणी:

लॅम्बडा सहालोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) 180 मिली व हेक्सकोन्याझोल 5% ईसी (टाटा रॅलीस-कॉन्टाफ) 300 मिली प्रति 300 लिटर पाणी याची फवारणी एकरी आंबा झाडांच्या मोहोरावर घ्यावी. या फवारणीमुळे वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांपासून व रसशोषक किडींपासून मोहोराचे संरक्षण होईल.

टीप:

  • फवारणीसाठी लागणारी पाण्याची मात्रा अंदाजाने घ्यावी.
  • झाडाचा आकार, वयोमान यानुसार पाण्याची मात्रा ठरवावी .
  • फवारणी संपूर्ण झाडावर घ्यावी.
  • तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच एकापेक्षा अधिक घटक मिसळा.
  • फवारणी सकाळी 11च्या आत व संध्याकाळी 4 नंतर द्यावी.
  • फवारणीमध्ये स्टिकर 100% टाकायचं आहे.

तुमच्या आंबा पिकात तुम्ही नॉव्हेमनबर महिन्यात काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. आंबा झाडाला लागणारे प्रमुख कीटक कोणते?

आंबा झाडाला लागणारे तुडतुडे, पिठ्या ढेकूण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा, कोळी, मिजमाशी अशे 10 ते 12 प्रमुख कीटक आहेत.

2. आंबा पिकाला मोहोर कधी येतो?

आंब्याच्या पिकाला मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते.

3. आंब्यावरील बुरशीजन्य रोगांपैकी सर्वात जास्त हानिकारक रोग कोणता?

पावडरी बुरशी म्हणजेच भुरी हा आंबा पिकावरील सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.

58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor